व्हाटसअ‍ॅपचा मॅसेज किती जणांनी फॉरवर्ड केला ते समजणार

0

व्हाटसअ‍ॅपच्या नवीन फिचरच्या माध्यमातून आता कोणताही शेअर करण्यात आलेला मॅसेज हा नक्की किती जणांनी फॉरवर्ड केलाय हे समजणार आहे.

व्हाटसअ‍ॅपने आधीच पाचपेक्षा जास्त वेळा फॉरवर्ड केलेल्या मॅसेजवर फॉरवर्डेड असे शब्द अंकीत करण्याचे फिचर अंमलात आणले आहे. यानंतर याच फिचरची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे संकेत या वर्षीच्या मार्च महिन्यात मिळाले होते. तेव्हा समोर आलेल्या माहितीनुसार, युजर्सला ‘फॉरवर्डेड इन्फो’ हे नवीन फिचर देण्याचे संकेत मिळाले होते. आता हे फिचर काही युजर्सला प्रदान करण्यात आले आहे. यामुळे आता एखादा मॅसेज हा अनेक वेळेस फॉरवर्ड करण्यात आल्यास याच्या वर ‘फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड’ असे शब्द अंकीत असतील. यापेक्षाही सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपण पाठविलेले मॅसेज हा नक्की किती जणांनी वाचला याची माहितीदेखील कळणार आहे. यासाठी संबंधीत मॅसेज थोडा वेळ दाबून धरल्यानंतर ( i ) या आयकॉनवर क्लिक करावे लागेल. आधी येथे फक्त डिलीव्हर्ड आणि सीन अशा दोन बाबी होत्या. यात आता ”फॉरवर्डेड….टाईम्स” ( यातील टिंबांच्या ठिकाणी आकडा असेल. )
ही नवीन माहितीदेखील येणार आहे. काही युजर्सनी ट्विटरवरून आपल्याला हे फिचर व्हाटसअ‍ॅपच्या अपडेटमध्ये मिळाल्याची माहिती दिलेली आहे. अद्याप सर्व युजर्सला ही सुविधा मिळाली नसली तरी टप्प्याटप्प्याने याला प्रदान करण्यात येईल असे मानले जात आहे.

दरम्यान, व्हाटसअ‍ॅपने आधी प्रयोगात्मक अवस्थेत असणारे ग्रुप अ‍ॅड करण्याचे फिचर आता क्रमाक्रमाने आपल्या युजर्सला देण्यास प्रारंभ केला आहे. याच्या अंतर्गत युजर आपल्या अकाऊंटच्या सेटींगमध्ये जाऊन ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक ते पर्याय निवडू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here