मी नोटबुक १४ मालिका भारतात सादर : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

शाओमीने आपली मी नोटबुक १४ ही लॅपटॉपची मालिका भारतीय ग्राहकांना सादर केली असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

शाओमीने आधीच मी नोटबुक १४ ही मालिका भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. यानुसार ही मालिका लाँच करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत मी नोटबुक १४ या मॉडेलचे तीन तर मी नोटबुक १४ होरायझन एडिशनचे दोन व्हेरियंट ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टल्ससह शाओमीच्या संकेतस्थळावरून १७ जून पासून खरेदी करता येणार आहे. मी नोटबुक १४ या मालिकेतील विविध व्हेरिंटसचे मूल्य ४१,९९९ तर होरायझन एडिशनचे मूल्य ५४,९९९ रूपयांपासून सुरू होणारे आहेत.

मी नोटबुक १४ आणि होरायझन एडिशन या दोन्हीमध्ये रॅम-स्टोअरेज; प्रोसेसर आणि ग्राफीक कार्ड यांच्यातील फरक वगळता अन्य सर्व फिचर्स समान आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये १४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. दोन्ही मॉडेल्स विंडोज १० होम एडिशन या आवृत्तीवर चालणारे आहेत. यात दर्जेदार बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर १० तासांचा बॅकअप मिळणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर ६५ वॅट क्षमतेच्या फास्ट चार्जरच्या मदतीने यात ३५ मिनिटांमध्येच ५० टक्के बॅटरी चार्ज होत असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. डीटीएस तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील ऑडिओ सिस्टीम अतिशय दर्जेदार अशी आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, एचडीएमआय, युएसबी, युएसबी टाईप-सी आदी पर्याय दिलेले आहेत.

शाओमीच्या मी नोटबुक १४ या मॉडेलमध्ये दहाव्या पिढीतील कोअर आय ५ प्रोसेसर दिला असून याची रॅम ८ जीबी तर स्टोअरेजसाठी २५६ आणि ५१२ जीबी असे पर्याय आहेत. याला एनव्हिडीयाच्या जीफोर्स एमएक्स २५० या ग्राफीक प्रोसेसरची जोड दिलेली आहे. तर मी नोटबुक १४ होरायझन एडिशन या मॉडेलमध्ये ८ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोअरेज दिलेले आहे. यात एनव्हिडीयाचा जीफोर्स एमएक्स ३५० हा ग्राफीक प्रोसेसर आहे. तर यामध्ये दहाव्या पिढीतील कोअर आय-७ प्रोसेसरचा पर्याय देखील दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here