शाओमीच्या रेडमी नोट ९ मालिकेचे आगमन : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

शाओमीने आज रेडमी नोट ९ या मालिकेला आज भारतीय बाजारपेठेत लाँच केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

शाओमी इंडियाचे प्रमुख मनुकुमार जैन यांनी काही दिवसांपूर्वीच रेडमी नोट ९ मालिका लाँच करण्यात येणार असल्याचे अतिशय सूचकपणे जाहीर केले होते. याचे अनेक लीक्सदेखील समोर आले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज रेडमी नोट ९ प्रो आणि रेडमी नोट ९ प्रो मॅक्स हे दोन मॉडेल्स भारतीय ग्राहकांना सादर केले आहे. यातील रेडमी नोट ९ प्रो या मॉडेलला ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे १२,९९९ आणि १५९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. तर रेडमी नोट ९ प्रो मॅक्सला ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज, ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज अशा तीन पर्यायांमध्ये अनुक्रमे १४,९९९; १६,९९९ आणि १८,९९९ रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. हे सर्व व्हेरियंटस इंटरस्टेलर ब्लॅक, अरोरा ब्ल्यू आणि ग्लेशिएर व्हाईट या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. शाओमीच्या संकेतस्थळासह याला अमेझॉन इंडियावरून उपलब्ध करण्यात आले आहे.

शाओमी रेडमी नोट ९ प्रो या मॉडेलमध्ये ६.६७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे २४०० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा पंच होल या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७२० हा गतीमान प्रोसेसर दिलेला आहे. फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह यातील बॅटरी ५०४० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. हे मॉडेल अँड्रॉइड १० वर आधारित असणार्‍या मीयुआय ११ या प्रणालीवर चालणारे आहे. याच्या मागील बाजूस क्वॉड कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यातील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला ८, ५ आणि २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. या चारही कॅमेर्‍यांच्या मदतीने फोर-के क्षमतेचे चित्रीकरण शक्य असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एआय या फिचरने युक्त असणारा १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

शाओमी रेडमी नोट ९ प्रो मॅक्स या मॉडेलमधील बहुतांश फिचर्स शाओमी रेडमी नोट ९ प्रो प्रमाणेच आहेत. यातील मुख्य फरक हा कॅमेर्‍यांमध्ये आहे. याच्या मागील बाजूस प्रमुख कॅमेरा हा ४८ ऐवजी ६४ मेगापिक्सल्सचा आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा हा ३२ मेगापिक्सल्सचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here