शाओमीच्या स्मार्टफोनमध्ये तब्बल १०८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा

0

स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यांमध्ये स्पर्धा सुरू असतांना आता शाओमी मी सीसी ९ प्रो या मॉडेलमध्ये तब्बल १०८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असून आज याचे अनावरण करण्यात आले.

सध्या ४८ मेगापिक्सल्स कॅमेर्‍यांनी युक्त असणारे स्मार्टफोन प्रचलीत होत आहेत. मध्यंतरी काही कंपन्यांनी ६४ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचे मॉडेल्स लाँच केले आहेत. ते लोकप्रिय होण्याआधी आता शाओमी कंपनीने तब्बल १०८ मेगापिक्सल्स कॅमेर्‍यांनी युक्त असणार्‍या मी सीसी ९ प्रो या मॉडेलचे आज अनावरण केले आहे. कंपनीने आधीच याबाबत टिझर्सच्या माध्यमातून माहिती दिली असून आज याच्या सर्व फिचर्सला जाहीर करण्यात आले.

शाओमी मी सीसी ९ प्रो या मॉडेलमध्ये मागील बाजूस पाच कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील प्रमुख कॅमेरा अर्थातच १०८ मेगापिक्सल्सचा असून हे सॅमसंगचे आयसोसेल ब्राईट एचएमएक्स हे सेन्सर आहे. याला २० मेगापिक्सल्सच्या वाईड अँगल लेन्सने युक्त दुसरा; १२ एक्स टेलीफोटो लेन्सनेयुक्त तिसरा, पोर्ट्रेट मोडसाठी १२ मेगापिक्सल्सचा चौथा तर २ मेगापिक्सल्सचा मॅक्रो लेन्सयुक्त पाचव्या कॅमेर्‍याची जोड दिलेली आहे. या पाचही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा घेता येणार असून चलचित्रीकरण करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ३२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता शाओमी मी सीसी ९ प्रो या मॉडेलमध्ये ६.४७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७३० हा प्रोसेसर दिलेला आहे. याचे ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज; ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज असे तीन व्हेरियंट बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा हे मॉडेल चीनमध्ये लाँच करण्यात येणार असून नंतर क्रमाक्रमाने भारतासह अन्य देशांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. फास्ट चार्जींगच्या सपोर्टने युक्त असणारी यातील बॅटरी ५,२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा मीयुआय ११ हा युजर इंटरफेस दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here