दोन व्हेरियंटमध्ये मिळणार झोलोचा ‘हा’ स्मार्टफोन !

0

झोलो कंपनीने झेडएक्स हे नवीन मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर केले असून याला दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

झोलो या भारतीय कंपनीने झोलो झेडएक्स या मॉडेलबाबत आधीच माहिती दिली होती. आता याला बाजारपेठेत सादर करण्यात आले आहे. याला ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यांचे मूल्य अनुक्रमे ११,४९९ आणि १३,९९९ रूपये असून यासाठी मिडनाईट ब्लॅक आणि इलेक्ट्रीक ब्ल्यू हे दोन रंगाचे पर्याय आहेत. झोलो झेडएक्ससोबत जिओने २२०० रूपयांच्या कॅशबॅकची सुविधा दिलेली आहे.

झोलो झेडएक्स या मॉडेलमध्ये ६.२२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण दिलेले असून याचा अस्पेक्ट रेशो १९:९ असा आहे. यामध्ये मिडीयाटेकचा ऑक्टा-कोअर हेलीओ पी २२ हा प्रोसेसर आहे. वर दिल्यानुसार याचे रॅम व स्टोअरेज असणार आहे. यावर विविध गेम्सला उत्तम प्रकारे खेळण्यासाठी एआय गेमींग मोड दिलेला आहे. याच्या मागील बाजूस १३ व ५ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांनी युक्त असणारा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ३२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली असून यात इंटिलेजीयंट मबॅटरी मोड दिलेला आहेह. याच्या मदतीने युजरला नेमके कोणते अ‍ॅप जास्त बॅटरीचा वापर करतेय याची माहिती मिळून ते अ‍ॅप बंद करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here