युट्युब म्युझिक व प्रिमीयम सेवा भारतात सादर

0

भारतीय युजर्ससाठी युट्युब म्युझिक व युट्युब प्रिमीयम या दोन सशुल्क सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत.

युट्युबला भारतात अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. यावरील बहुतांश कंटेंट हे मोफत अर्थात जाहिरातयुक्त आहे. तथापि, जाहिरातमुक्त व्हिडीओज आणि युट्युबने तयार केलेल्या काही ओरिजीनल्स मालिकादी कार्यक्रम आणि चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी युट्युब प्रिमीयम ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी ग्राहकाला दरमहा १२९ रूपये अदा करावे लागणार आहेत. यात १८९ रूपये दरमहा भरून फॅमिली प्लॅन घेता येणार असून यामध्ये सहा युजर्सला या सेवेचे वापर करता येणार आहे. ही सेवा घेणार्‍यांना युट्युबवरील सर्व प्रिमीयम या वर्गवारीतील व्हिडीओ कंटेंटचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, यासोबत युट्युब म्युझिक ही सेवादेखील सुरू करण्यात आली असून यासाठी दरमहा ८० रूपये अदा करावे लागणार आहेत. यामध्ये कुणीही युट्युबवर असणार्‍या गाणी, अल्बम्स आदींच्या माध्यमातून लक्षावधी गाण्यांचा आनंद लुटू शकणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याची सुविधादेखील दिलेली आहे. यात युजर त्याला हव्या त्या पध्दतीत गाण्यांची यादी (प्ले-लिस्ट) करू शकतो. तसेच यात स्मार्ट सर्च करण्याची सुविधादेखील मिळणार आहे. यामध्ये युजर ऑफलाईन या पध्दतीतही संगीताचा आनंद घेऊ शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here