युट्युबवरील बालकांच्या व्हिडीओजवर आता कॉमेंट करण्यास मज्जाव

0

युट्युबने आता बालकांच्या व्हिडीओजवर कॉमेंट करण्यास प्रतिबंध लादला असून सुरक्षेसाठी हे करण्यात आल्याचे नमूद केले आहे.

युट्युबने आपल्या युजर्सची एंगेटमेंट वाढण्यासाठी कोणत्याही व्हिडीओवर कॉमेंट करण्याची सुविधा दिलेली आहे. खरं तर युजर व्हिडीओ अपलोड करतांना त्यावर कॉमेंटची सुविधा ब्लॉक करू शकतो. मात्र जास्तीत जास्त युजर्स प्रतिक्रिया खुल्या ठेवतात. लोकप्रिय व्हिडीओजवर अक्षरश: हजारो कॉमेंट होत असतात. याचा अर्थातच युजरला लाभ होतो. मात्र या कॉमेंटच्या माध्यमातून हेट स्पीच तसेच अश्‍लील भाषेचा वापर करण्यात येतो. अनेक व्हिडीओजवर तर अतिशय खालच्या स्तरावरून प्रतिक्रिया नोंदविलेल्या असतात. यातच ज्या व्हिडीओमध्ये बालकांचा समावेश असतो, त्यावर काही विकृत लोक हीन भाषेत गरळ ओकत असतात. तर अलीकडेच काही व्हिडीओजवर मोमो चॅलेंज या जिवघेण्या गेमशी संबंधीत काही लिंक्ससुध्दा आढळून आल्या होत्या. यामुळे आता बालकांच्या व्हिडीओजवरील कॉमेंट ब्लॉक करण्यात येत असून युट्युबने याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

यासोबत युट्युबने आता आपल्या मंचावरील सर्वच व्हिडीओजवरील आक्षेपार्ह कॉमेंटला अतिशय परिणामकारक पध्दतीत मॉनिटर करण्यासाठी कॉमेंट क्लासीफायर हे टुल सादर करण्याची घोषणा केली आहे. याच्या मदतीने असभ्य कॉमेंटला प्रतिबंध घालणे शक्य होणार आहे. सध्या हे टुल प्रयोगात्मक अवस्थेत असून लवकरच याला कार्यान्वित केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here